क्राईमताज्या घडामोडीदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

बातमी लावणारा पत्रकार कोण आहे ? त्याचा बंदोबस्त करा रोलेट चालकांचा फतवा


नाशिक/प्रतिनिधी:- नाशिक शहर तसेच नाशिक रोड जेलरोड मध्ये मोठ्या प्रमाणात अनेकांचे कुटुंब उध्वस्त करणारा रोलेट बिंगो चा ऑनलाईन गेमिंग खेळ खेळवला जात असल्याची बातमी प्रसिद्ध केल्याने रोलेटच्या माध्यमातून लाखो करोडोंची माया कमावणारे आता थेट बातमी लावण्याचा बंदोबस्त करा इथपर्यंत येऊन थांबले आहेत. सामाजिक व शहरी स्वास्थ्य अबाधित राहो यासाठी पत्रकार आहोरात्र झटत असतो विविध घटनांच्या बातम्या करत असतो हे करत असताना पत्रकार कधीही त्याच्या जीवाची काळजी करत नाही हे अंतिम सत्य. शहर आयुक्तालयात अवैध धंदे चालकांवर असलेला पोलिसांचा वचक शून्य झाल्यानेच गैर कृत्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सर्वांचाच गळा दाबण्याचे धाडस गुन्हेगारांचे झाले आहे. मदत कुणाकडे मागावी हा एक्ष प्रश्न सध्या निर्माण झाला आहे कारण आपलं ओझं आपल्यालाच उचलायचं आहे ही म्हण देखील खोटी नाही. किती पत्रकार संपवणार गौरी लंकेश, जे.डे अनेक उदाहरण आहेत मात्र पत्रकारिता कधीही थांबलेली नाही आणि थांबणार देखील नाही. आम्ही कुठल्याही पत्रकार संघटना शासन किंवा पोलीस यंत्रणेकडे आमच्या जीवाची भीक मागण्यासाठी अर्जवे करणार नाही कारण आमच्या पदरी निराशाच पडणार हे आम्हाला चांगले ठाऊक म्हणून जे संकट येईल त्याला कायम सामोरे जाऊ हा आमचा निश्चय आहे. जगलो वाचलो तर यापुढेही गैरकृत्य करणाऱ्या कुठल्याही यंत्रणेची मग ती गुन्हेगारी असो राजकीय किंवा पोलीस भीडभाड ठेवली जाणार नाही. जनावर कापतात तशी माणसांची कत्तल नाशिक शहरात होत आहे त्यात समाजाला जागृत करणाऱ्या व पायबंध घालणाऱ्या यंत्रणेला त्यांचा खरा चेहरा दाखवणाऱ्या अजून एका पत्रकाराचा बळी गेला तरी आमच्या कर्तव्यापासून निदान आम्ही तरी पाठ फिरवणार नाही, तुमचे तुम्ही बघा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!