गुरूंची रासलीला चित्रपट अडकला तांत्रिक अडचणीत, भिऊ नकोस प्रोडक्शन हाऊस अडचणी सोडवणार ?
भिऊ नकोस प्रोडक्शन हाऊस सह यातील मुख्य कलाकार चित्रपट प्रदर्शनात अडचणी येत असल्याने हवालदिल !
संपूर्ण राज्यसह देशाचं ज्या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याकडे लक्ष लागलेल्या आहे त्या भिऊ नकोस प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत गुरूंची रासलीला चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडचणी येत असल्याने निर्मात्यांसह कलाकार देखील कमालीचे हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. आधीच या चित्रपटाची कहाणी गुंतागुंतीची असून त्यात चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत देखील कमालीचा सस्पेन्स निर्माण होताना दिसून येत आहे नेमकी या चित्रपट प्रदर्शनाला काय अडचणी येत आहेत हे स्पष्ट समजू शकले नसले तरीही प्रोडक्शन हाऊसचे ठाम म्हणणे आहे की काहीही झाले तरी हा चित्रपट आम्ही लवकरच पूर्ण करू आणि असलेल्या सगळ्या नियम अटींचे पालन करून अडचणींवर मात करत हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला नक्कीच आलो असा विश्वास प्रगट केला जात आहे. खरंतर या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर किंवा दृश्यांवर सेंसर बोर्डचा काही आक्षेप आहे का किंवा कुठल्या प्रकारच्या अडचणी या प्रोडक्शन हाऊसला येत आहेत याबाबत उघड सांगण्यास निर्मात्यांसह कलाकार बोलायला तयार नाहीत परंतु यात पुढे प्रेक्षकांना धक्का देणारा सीन या चित्रपटात असल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळेच चित्रपटाच्या पुढील शूटिंग व प्रदर्शित होण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे मात्र यावर तोडगा काढण्यासाठी मोठ्या राजकीय नेत्यांना मध्यस्थी करण्याची याचना प्रोडक्शन हाऊस व कलाकारांकडून केली जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे तर चित्रपट सृष्टीत अनेक अडचणींना सामोरे जात रसिकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची काही काळ अजून वाट बघावी लागणार मात्र प्रदर्शित झालेला चित्रपट पाहून वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करणारा गुरूंची रासलीला हा चित्रपट सुखावून टाकणारा असेल याबाबत आश्वासित केले जात आहे.



