ताज्या घडामोडीदेशब्रेकिंग न्यूजमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसंपादकीयसामाजिक

महायुती व मविआ च्या सर्वेत नापास ठरलेल्या दिनकर पाटलांसाठी उद्या राज ठाकरेंची सभा


जनतेला भूमिका बदलणारे राज ठाकरेच मान्य नाही तर दिनकर पाटलांचं काय

Advertisement

नाशिक/प्रतिनिधी:- महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आपलं स्थान व महत्त्व निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे सर्वश्रुत आहे कारण पक्ष, पक्षाची भूमिका, पक्षासाठी व पक्षातील नेते व कार्यकर्त्यांसाठीची आचारसंहिता, ध्येयधोरणे, एका विशिष्ट चौकटीत राहून अमलात आणली जातात. महाराष्ट्र हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रोखठोक, स्पष्टवक्ता व काहीही झाले तरी भूमिका न बदलणाऱ्या धुरंदर व्यक्तिमत्वा नंतर बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरे यांच्याकडे आशावादी नजरेने पाहत होते, की महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरे हे आपलं वेगळं अस्तित्व नक्कीच अधोरेखित करतील आणि त्यांनी केलेल्या नवनिर्माणाच्या संकल्पनेला निश्चितच मूर्त स्वरूप प्राप्त करून देतील परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी सतत बदललेली भूमिका महाराष्ट्रीय जनतेला पचनी न पडल्याचे दिसून येत आहे, त्यामुळेच तर चित्रपट पाहावा परंतु त्याचा फारसा परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही फक्त एंटरटेनमेंट साठीच चित्रपट पाहायचा तसे राज ठाकरे यांच्या सभेला एंटरटेनमेंट म्हणून लोक जातात मात्र राजगर्जनेचा त्यांच्यावर कुठलाही प्रभाव आता जाणवत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
उद्या दि.16 नोव्हेंबर रोजी नाशिक मध्ये राज ठाकरे यांची विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. मात्र या सभेच्या आधी राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांच्यातील सतत बदलणाऱ्या भूमिकेच्या साम्यावर जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. मध्यंतरी च्या काळात भाजपवासी असलेले दिनकर पाटील हे पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र महायुतीने केलेल्या सर्वेत दिनकर पाटील हे स्पष्टपणे नापास झाल्याने तसेच नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या त्यांच्या वार्ड व्यतिरिक्त शहरात अन्य ठिकाणी त्यांचा प्रभाव नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्याने दिनकर पाटील यांनी आत्मपरीक्षन करणे अपेक्षित असताना मात्र पाटील यांनी तुरंत आपली भूमिका बदलत भाजपला जय श्रीराम केला व महाविकास आघाडीतील एखाद्या घटक पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळते का यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र महाविकास आघाडीने लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत ही अगदी सावध भूमिका घेत निवडून येणाराच सक्षम उमेदवार देण्याचा संकल्प केल्याने इथेही दिनकर पाटील यांचे स्वप्नभंग झाल्याने पुन्हा त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मनसेत पक्ष प्रवेश केला व पश्चिम मतदार संघाची उमेदवारी मिळवली. नाशिक म्हणजे मनसेचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता कारण याच नाशिकने एकेकाळी तीन आमदार, 40 नगरसेवक निवडून दिले होते मात्र मनसे किंबहुना राज ठाकरे यांना नाशिकचा बालेकिल्ला साबूत ठेवता आला नाही याचे स्पष्ट कारण म्हणजे राज ठाकरे आणि मनसेची सतत बदलणारी भूमिका. नुकताच नाशिक मध्ये मनसेचा पार पडलेला 18 वा वर्धापन दिनानिमित्त स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व उपस्थितांना आपल्या भाषणातून स्पष्ट सांगितले होते मला माझ्या अंगाखांद्यावर माझी मुलं खेळवायची आहेत त्यांना मोठे करायचे आहे, आपले सोडून इतरांचे मुलं अंगा खांद्यावर खेळवायची मला इच्छा नाही, माझ्यावर विश्वास ठेवा मी नक्कीच चांगला बदल घडवेल असेही यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणातून उपस्थितांना साद घातली, असे असताना याच नाशिक मध्ये मनसेत सक्रिय असलेले इतर निष्ठावंत असतानाही राज ठाकरे यांनी दुसऱ्याचे पोरं का बरं कडेवर घेतले असतील याबाबत देखील शहरात जोरदार चर्चा सुरू आहेत सोबतच पक्षातल्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा मंजूर आहे परंतु ऐनवेळी पक्षात आलेल्या दुसऱ्या पक्षांनी नापास ठरवलेल्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी बहाल करणे हे पक्षातील नेते कार्यकर्ते तसंच नाशिककर जनतेला पटलेले नाही त्यामुळेच नाशिकमध्ये होणारी राज ठाकरे यांची सभा ही फक्त चित्रपटाप्रमाणे एंटरटेनमेंट म्हणून पहायची त्याचे मतात रूपांतर करायचे नाही आणि आपल्या वास्तविक जीवनावर परिणाम करून घ्यायचा नाही असे मत पश्चिम मतदारसंघासह नाशिककर जनता व्यक्त करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!