“गुरूंची रासलीला” चित्रपट गाजवणार आगामी विधानसभा निवडणुक
“भिऊ नकोस” प्रोडक्शन हाऊस मुळे काही राजकीय मंडळी “कसा भिऊ नको” या मानसिकतेत
नाशिक/प्रतिनिधी:- मराठीत एक म्हण आहे “नकटीच्या लग्नाला सत्रा विघ्ने” अशी काहीशी परिस्थिती सध्या मायानगरीत पाहायला मिळत आहे, ज्या काल्पनिक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तो अण्णासाहेब दिग्दर्शित ‘भिऊ नकोस’ प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत “गुरूंची रासलीला” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटातील काही दृश्य आणि चित्रपटातील कलाकार यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारण एक गट प्रोडक्शन हाऊस आणि दिग्दर्शक अण्णासाहेबांच्या बाजूचा समजला जातो, प्रोडक्शन हाऊस दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलाकारांचे अधिक हितसंबंध या गटा सोबत असल्याने या चित्रपटाच्या निमित्ताने विरोधी गट ॲक्शन मोड मध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि तशा हालचाली ही सुरू झाल्या आहेत.
हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून ज्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापू शकते ते मुद्दे सध्या राज्यात सर्वीकडे चर्चिले जात आहे.
सर्वप्रथम तर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची परवानगी घेतली होती का?, चित्रीकरण करणारे कॅमेरामॅन आणि प्रमुख भूमिकेत असलेली हिरोईन हिने स्वतः हीरोइन असतानाही कॅमेरामॅन ची भूमिका का बजावली?, चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अनेक दृश्य हे मुख्य कलाकार असलेले आश्रम गुरु यांना माहीत होऊ न देता कॅमेरामॅनने का चित्रित केलेल्या आहेत?, चित्रपटातील काही आक्षेपार्य चित्रफिती वरून प्रमुख भूमिकेतील मुख्य कलाकार आश्रम गुरूकडून करोडोंची मागणी कोणी केली? चित्रफीत नेमकी बनवली कोणी आणि कशासाठी?, या चित्रपटाच्या निमित्ताने यातील सहकालाकारांचे एक दुसऱ्या विरोधात अर्ज किंवा गुन्हे दाखल केल्याच्या संशयास्पद कारवाया का झाल्या असतील?, काही आक्षेपार्य चित्रित मजकुरातील इसम एक आणि गुन्हा दाखल करणारा दुसराच ही भानगड काय?, यातील महिला कलाकाराने सहकलाकारा विरोधात लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा तक्रार अर्ज दाखल केला होता का? त्याचप्रमाणे बलात्कारासारखा गंभीर आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज घेऊन नंतर तो कसा निकाली काढला? या घडामोडींमध्ये खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केल्यामुळे मोठी आर्थिक तडजोड करत पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली आहे का? तक्रारदार कायद्याला जुमानत नाही का किंवा प्रकरण मिटवण्यासाठी कुठला दबाव तक्रारदाराला सहन करावा लागला आहे का? दोन्हीही बाजूंनी प्रकरण मिटलं असे जरी सांगितले जात असले तरी मात्र तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कायद्याचा वापर कसा करू शकतात? आश्रम गुरु आणि त्यांचे तीन अय्याश मुलं हे कुठल्या राजकीय नेत्याचे अश्रित आहेत ज्यामुळे ते कोणालाही कधीही संपवण्याची भाषा करतात? या चित्रपटातील कलाकार आश्रम गुरु व त्याचे तीन अय्याश मुलं आपल्या सोईप्रमाणे कुठला गुन्हा झाकण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय मंडळींचा वापर करून घेत आहेत? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत या पलीकडेही अजून काही निरुत्तर करणारे भेदक सवाल देखील आहेत ज्यामुळेच खर तर राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत.
येत्या काळात ‘भिऊ नकोस’ प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत गुरूंची रासलीला हा चित्रपट प्रदर्शित होईलच मात्र या चित्रपटातील काही कलाकार आणि राजकीय मंडळी “कसा भिऊ नको….” या विवंचनेत मानसिक अस्थिर झाले आहेत हे मात्र नक्की.



